शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग महत्वाचे : प्रा. पवार

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग महत्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रा.के.एफ.पवार यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच लहान मुलांसाठी विद्यापीठाच्या योग मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित योग वर्गाचा समारोप शुक्रवार दि.२९ रोजी झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योग मार्गदर्शन केंद्र सुरु झालेले असून २० सप्टेंबरपासून विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी योग वर्ग सुरु करण्यात आले होते. या शिवाय लहान मुलांसाठी देखील स्वतंत्र वर्ग घेण्यात आले. या दोन्ही योग वर्गाचा समारोप शुक्रवारी झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. के.एफ.पवार उपस्थित होते. प्रारंभी केंद्राचे प्रमुख विद्यापीठ उपअभियंता इंजि.राजेश पाटील यांनी प्रास्ताविकात या केंद्रामार्फत सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. लवकरच या केंद्रातर्फे प्रमाणपत्र पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरु केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. लिना चौधरी व गौरव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्या पाटील, दिगनाथ कुवर, जतीन पाटील आणि तेजस पाटील या बालकांनी रिदमिक योग प्रात्यक्षिक सादर केले. प्रा. मनिषा इंदाणी, वैशाली शर्मा, प्रणाली कुवर या योगसाधकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पालकांच्यावतीने प्रा.अमरदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. लिना चौधरी यांनी करुन दिला. योग शिक्षक गौरव जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशवंत गरुड, हिम्मत जाधव, सुनील चव्हाण, भिकन पाटील, युवराज मोतीराया, भगवान साळुंखे यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज