fbpx

के.के. उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये अंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । जळगाव येथील के .के. उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 7 वा अंतरराष्ट्रीय योग्य दिवस आन लाईन व आफ लाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळेस मुख्याध्यापक अकिल खान यांनी योगासनचे महत्व व फायदे व्यक्त केले. 

शेख तबरेज असलम यानी सध्या च्या धकाधकीत व गतिशील जीवन पद्धती मध्ये कमीत कमी वेळेत कसे सुदृढ राहु शकतात यावर योगासन पद्धतीचे उपाय व उपचाराचे  राज मार्ग दाखवून विविध आसनांचा परिचय व प्रत्याक्षीक करून दाखविले. 

यावेळी इम्रान खान, अब्दुल कय्युम शेख, जाकीर शाह, यानी आन लाईन पद्धतीने प्रोजेक्टर व यु ट्युब च्या माध्यमाने माहिती प्रसारित केली. नाजिया शेख, असमा शेख, यानी महिलांसाठी योगासान चे फायदे या विषयी माहिती दिली. तसेच शेख मझहरोदीन, समीना सत्तार, मुश्ताक भिस्ती, रिजवाना सैय्यद याच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज