fbpx

यावल तालुका ग्रामसेवक युनियनतर्फे ऑक्सिजन सेंटरला ५० हजारांची मदत

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील बाधीत रुग्णांची उपचारा आभावी होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी फैजपुर येथे लोक सहभागातुन न्हावी फैजपुर येथील जेटी महाजन अभियांत्रीक महाविद्यालयात शंभर ड्युरा ऑक्सीजन बॅड सेन्टर उभारणीचा संकल्प केला.

यास रावेर आणी यावल च्या समाजसेवी दानसुरांनी मदत करावी असे आवाहन केले असुन यास मोठा प्रतिसाद मिळत आहे  आज दिनांक ४ मे रोजी यावल येथील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या यावल तालुका ग्रामसेवक शाखाच्या माध्यमातुन लोक सहभागातुन ऑक्सीजन सेन्टर उभारणी पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात आली.

mi advt

दरम्यान ग्रामसेवक युनियनच्या हस्ते देण्यात आलेली आर्थीक मदत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश शांताराम पाटील यांच्या हस्ते तहसीलदार महेश पवार यांच्या सुर्पूद करण्यात आले. या प्रसंगी नायब तहसीलदार आर डी पाटील, सुयोग पाटील,  ग्रामपंचायत विस्तार अधिकारी हबीब तडवी तालुका अध्यक्ष रुबाब तडवी, सचिव पुरूषोत्तम व्ही तळेले, हितेन्द्र महाजन, राजु तडवी मजीत अरमान तडवी यांच्यासह आदी मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज