fbpx

आदिवासींच्या पोषणासाठी कोट्यवधींचा खर्च तरीही ते कुपोषणग्रस्तच !

टाळूवरचे लोणी खायचं काम करणाऱ्यांना शिक्षा केव्हा?

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । (रविंद्र बिऱ्हाडे) । शासनाकडून आदीवासी वस्ती व पाड्यांसाठी विविध योजनाअंतर्गत जवळपास आठ कोटी रुपयांचा निधी मिळत असतो असे असतांना तालुक्यात आठ महिन्यांचा बालक कुपोषणाचा बळी पडतो ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास अधिकारी विनिता सोनवणे यांच्याकडुन जाणुन घेतला आदीवासींच्या योजना संदर्भातील माहीतीचा विशेष वृत्तांत.

यावल तालुक्यातील वड्री आसराबारी येथील आदीवासी वस्तीवर मागील महीन्यात कुपोषणामुळे आठ महिन्यांच्या आकाश बारेला याचा जळगाव येथे दुदैवी मृत्यु झाला आणि या निमित्ताने तालुक्यात महीला व बालविकास विभाग व आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ व भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत तालुक्यातील कुपोषणग्रस्तांची धक्कादायक आकडेवारी समोर मांडत महिला व बालविकास तथा आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षीत कारभारावर नाराजी व्यक्त केली होती.

एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिलेल्या माहीतीनुसार, यावल तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या आदीवासी वस्तीवर वास्तव्यास राहणाऱ्या आदीवासी बांधवांच्या चिमकुल्यांसाठी एपीजे अब्दुल कलाम अमृत पोषण आहार या योजनेच्या माध्यमातुन आदीवासी कुटुंबावर उपासमारीची वेळ येवु नये यासाठी शासनाच्या वतीने वर्षाला सुमारे तीन कोटी रुपये खर्च केले जातात. आरोग्य विभागाच्या माध्यमातून आदीवासी बांधवांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबवुन त्यांच्या कुटुंबाची युद्ध पातळीवर काळजी घेण्यासंदर्भात विविध आरोग्य योजने अंतर्गत वर्षाला ५ कोटी रूपयांचा निधी खर्च केला जात असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिली आहे.

तसेच आमच्या विभागाअंतर्गत केलेल्या शोध कार्यात देखील आदीवासी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात अनेक गंभीर प्रकार समोर आले असुन, आम्ही देखील स्वतंत्र चौकशीचा अहवाल हा वरिष्ठांपर्यंत पाठविला आहे. असे असतांना ही जळगाव जिल्ह्यात व यावल तालुक्यात कुपोषणग्रस्तांची वाढलेली संख्या ही धक्कादायक व शासकीय योजना या खऱ्या अर्थाने आदीवासी वस्ती व पाडयावाडयांवर फक्त कागदावरच पोहचली असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात या योजनांची अंमलबजावणी झालेली नसल्यानेच कुपोषणाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

कुपोषणग्रस्तांच्या विषयाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी गांर्भीयाने घेतले असून कुपोषण संदर्भातील निष्पक्ष चौकशी व्हावी या दृष्टीकोणातून त्रिसदस्यांची नेमणूक केली व समितीच्या अहवालावरून कुपोषणग्रस्त आठ महीन्याच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी ७ जणांना शोकॉज नोटीसा पाठविल्या आहेत. समितीची नेमणूक, नोटीसनंतर पुढील होणाऱ्या कार्यवाहीकडे विविध राजकीय पक्ष, समाजसेवी संघटना व आदीवासी बांधवांसह सर्वांचे लक्ष लागुन आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज