यावलात तरुणाच्या हातातील मोबाईल केला लंपास; अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । यावलात रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून १२ हजार ४०० रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येवून हिसकावून नेल्याची घटना ८ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारा घडली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून येथील पोलीसात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, मोहम्मद तौफीक इसहाक कच्छी (वय-२१) रा. डागपुरा यावल हा आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शनिवार ८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास यावल शहरातील मनुदेवी मंदीराच्या समोर मोहम्मद कच्छी हा मोबाईलवर मित्राशी बोलत असतांना त्याच्या पाठीमागून अज्ञात दोन चोरटे दुकानी येवून हातातील १२ हजार ४०० रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून नेला. आरडाओरड केली परंतू चोरटे मोबाईल घेवून पसार झाले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री १० वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar