नोकरीसाठी पुण्यात‎ गेलेल्या यावलच्या तरुणाला ट्रकने चिरडले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । राेजगारासाठी पुण्यात‎ गेलेल्या यावल येथील २६ तरुणाचा पुण्यात अपघाती मृत्यू‎ ‎ झाला. हेमंत‎ ‎ प्रदीप तळेले‎ ‎असे मृताचे नाव‎ आहे. हा तरुण दीड महिन्यापूर्वीच‎ पुण्याला नोकरीकरिता गेला होता.‎ कामावर जाण्यासाठी वाहनाची‎ प्रतीक्षा करत असताना ब्रेक निकामी‎ ‎झालेल्या ट्रकने त्यास चिरडले. या‎ अपघातात इतर दोन असे एकूण तीन‎ जण ठार झाले आहेत.‎

हेमंत तळेले हा पुणे-बंगलोर‎ महामार्गावरील नवले पुलाजवळ‎ कामावर जाण्यासाठी वाहनाची‎ प्रतीक्षा करत उभा होता. दरम्यान‎ सकाळी नऊ वाजेच्या सुमारास‎ पुलावरून मार्गस्थ होणारा ट्रक‎ पुलावर इंधन संपल्याने त्याचा‎ चालक इंधन टाकून ट्रक सुरू‎ करण्यासाठी ब्रेक लावून इंधन‎ पाइपमधील एअर काढत होता.‎ त्याचवेळी अचानक ब्रेक निकामी‎ ‎ झाल्याने ट्रक चालकाविना मागील‎ बाजूने उतारावर धावू लागला.

यात‎ बसची प्रतीक्षा करणाऱ्या हेमंत‎ तळेलेसह इतर दोघे तरुण या‎ ट्रकखाली चिरडले जावून जागीच‎ ठार झाले. याबाबत सिंहगड रोड‎ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात‎ आला. मृत हेमंत तळेले याचा‎ मृतदेह येथे आण ला. बुधवारी‎ सकाळी ७ वाजता त्याच्यावर येथे‎ अंत्यसंस्कार करण्यात येतील. हेमंत‎ कुटुंबातील एकुलता एक होता.‎ त्याच्या पश्चात आई, बहीण व‎ मेहुणे असा परिवार आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -