fbpx

यावल पालिकेचे मुख्याधिकारी रंगेहाथ, टेंडर काढण्यासाठी मागितली लाच

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । पालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना 28 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने शुक्रवारी अटक केल्याने पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. टेंडर काढण्यासाठी तक्रारदाराकडून मुख्याधिकार्‍यांनी लाच मागितल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. लाच पडताळणीनंतर शुक्रवारी मुख्याधिकार्‍यांना थेट लाच घेताच अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज