सावदा येथील परदेशी कुटूंबियांचे मंत्री यशोमती ठाकुरांनी केले सात्वंन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । सावदा येथील परदेशी कुटूंबातील सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकुर या आज जळगाव जिल्ह्यातील  खिरोदा ता. रावेर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी परदेशी कुटूंबातील सुरज परदेशी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचे कुटूंबातील सुरज परदेशी यांचे सांत्वन  केले.

यावेळी त्यांनी शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी आणि त्यांच्या परिवारास धीर दिला व आपल्या कुटुंबाने जो समाजसेवेचा वारसा आपणास दिला आहे तो यापुढे सुरु ठेवा, आम्ही आपल्या सोबत सदैव राहू असा विश्वासही दिला.

तसेच भविष्यात काही आवश्यकता भासल्यास नक्की मदत करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.यावेळी त्यांचेसोबत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी खा. उल्हास पाटील, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह निलेश खाचणे, शाम पाटिल, गणेश माळी, मनीष भंगाळे, नितिन सपकाळे, स्वप्निल  परदेशी आदी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar