कंत्राटदारांचा लेखी गौप्यस्फोट, रक्कमही भरली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील गाैण खनिजच्या बाेगस पावत्या प्रकरणी कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच त्यांच्याकडून शासनाचे नुकसान झालेली रक्कम वसुली करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. दरम्यान, गाैण खनिजाच्या बाेगस पावत्या खुद्द अभियंत्यांनीच त्यांच्याकडून घेण्यास भाग पाडल्याचा लेखी खुलासाच संबंधित कंत्राटदारांनी केला आहे. दाेषी असलेल्या सर्वच कंत्राटदारांनी शुक्रवारी ३४ लाख रूपयांची रक्कम शासनाकडे जमा केली आहे.

जलसंधारण विभागात कामाची बिले काढतांना बिलाच्या रक्कमेतून गाैण खनिजाच्या राॅयटीची रक्कम कापून घेतली जाते; परंतु १४ कंत्राटदारांनी त्यांच्या बिलासाेबत गाैण खनिजाच्या शासकीय पावत्या जाेडून ही रक्कम कापून न देता काढून घेतली आहे. त्यामुळे शासनाचा लाखाे रूपयांचा महसुल बुडाला आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी पाठपुरावा केल्यानंतर चाैकशी हाेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले याहेत. त्याचसाेबत यात शासनाचे नुकसान झालेली रक्कम शासनाला परत करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले हाेते.

कंत्राटदारांचा लेखी गौप्यस्फोट

ही ३४ लाख रूपयांची रक्कम संबंधित कंत्राटदारांनी शासनाकडे भरली आहे. साेबतच लेखी पत्र देऊन गाैण खनिजाच्या पावत्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहे. जलसंधारण विभागातील दाेन अभियंत्यांनी बिले काढण्यासाठी त्यांच्याकडून या पावत्या घेण्याची सक्ती केली हाेती. शिवाय पावत्या खऱ्या असल्याचे आम्हाला सांगितले हाेते. असा दावाही या कंत्राटदारांनी केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -