fbpx

जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे ; चाळीसगावी भारतीय बौद्ध महासभेची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । बुद्धगया येथील जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील बौध्द बांधवांच्या वतीने भारतीय बौध्द महासभेच्या वतीने आज शुक्रवारी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले.

काय म्हटले आहे निवेदनात?

mi advt

निवेदनात म्हटले आहे की, भारतातील प्रत्येक धर्माचे पवित्र स्थळ हे त्या त्या धर्माच्या नियंत्रणाखाली आहे परंतु बुद्धगया येथील जगप्रसिद्ध बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात नाही त्यावर बौद्धांचे नियंत्रण होवू नये अशी तरतूद त्यासंदर्भातील कायद्यात केली आहे हे अन्यायकारक व गैरकायदेशीर असून बौद्धांच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली करणारे आहे.

सदर पवित्र व महान बुद्धगया विहार (मंदीर) बौद्धांच्या ताब्यात देण्यात याचे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे प्रचारक तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल , बौद्धाचार्य भैय्यासाहेब ब्राम्हणे धम्म उपासिका सोनालिताई लोखंडे आदी समाज बांधवांनी बौध्द धम्माचा इतिहास व बुद्धगया विहार बाबत सखोल माहिती दिली.

प्रसंगी पुज्य भिक्खु संघरत्न औरंगाबाद, भैय्यासाहेब ब्राह्मणे, संघमित्रा चव्हाण, गौतमभाऊ जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, चंद्रमनी पगारे, रवींद्र निकम, स्वप्नील जाधव, तुषार मोरे, भाईदास गोलाईत,मुकेश नेतकर, भैय्यासाहेब जाधव, सागर निकम, भागवत बागुल, आकाश देशमुख, वाल्मिक जाधव,  पितांबर झाल्टे, महेश चव्हाण, विशाल आहिरे, सोनू जाधव, भीमराव मोरे, विनोद खैरे, अनिल झाल्टे, राजरत्न मोरे, आकाश जवरे, आबासाहेब गरुड, गिरीश खापर्डे, संजय जाधव, आनंद बागुल, वैशाली अहिरे, भैय्यासाहेब जाधव, संपत करडक, बबलू जाधव, प्रेमदास जाधव, प्रकाश सोनवणे, मनोज जाधव, महेंद्र जाधव, देविदास जाधव, शिवाजी जाधव, पंढरीनाथ जाधव, विशाल पगारे, बाबा पगारे, सुरेश पगारे, सुनील निकम, गौतम आराक, किशोर जाधव आदी  बौद्ध बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज