‘सायबर सेक्युरिटी व ब्लॉक चेन टेक्नोलॉजी’वर कार्यशाळा संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील जी.एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणकशास्त्र व विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स अंतर्गत सायबर सेक्युरिटी व ब्लॉक चेन टेक्नोलॉजी या विषयावर आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

कार्यशाळेत अकॅडमिक, इंडस्ट्री व रिसर्च या क्षेत्रांतील आतंरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सायबर क्राईम, आयटी ॲक्ट, सायबर नियम ॲप्लिकेशन ऑफ मशीन लर्निग, सायबर सेक्युरिटी, ब्लॉक चेन टेक्नोलॉजी आदी विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.सोनल पाटील, प्रा.स्वाती पाटील, प्रा.शीतल जाधव, प्रा.हिरालाल सोळुंखे, प्रा.हर्षद पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणकशास्त्र विभागाची विद्यार्थीनी शाहनवाज सय्यद, श्रुती बडगुजर, मुकुल झोपे आणि प्रांजल चिरमाडे यांनी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज