सोनोटीच्या कामगारांना ऊसतोडीच्या निमित्ताने सांगलीत डांबून मारहाण, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । साेनाेटी ( ता.बोदवड ) येथून ऊसताेडीसाठी सांगली जिल्ह्यात नेऊन तेथे डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी येथील पाेलिसांत शहादेव सानप,रा.चिंचणी वांगी,जि.सांगली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सोनोटी येथील अरुण श्रावण सोनवणे (वय ३५) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार हे त्यांची पत्नी संगीता, दोन मुली विद्या व वैशाली व मुलगा अमर यांच्यासह सोनोटी येथे राहतात. ते पाच ते सहा वर्षांपासून दरवर्षी परिवारासह ऊसतोडीसाठी अहमदनगर, पुणे, सांगली जिल्ह्यांत जाऊन ऊस तोडीचे काम करतात. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात ते कुटुंबासह शहादेव सानप व शिवसेन सानप यांच्याकडे कर्नाटकातील नंदी कारखाना येथे ऊसतोडीसाठी गेले होते. त्यांचे मित्र किरण मोरे यांच्या कुटुंबालाही तेथे ऊस तोडीसाठी ठेवले होते. तसेच सानप यांच्याकडे चिंचणी वांगी येथे अरुण साेनवणेंच्या नात्यातील काही मजूर कामाला होते. साेनवणेंनी कर्नाटकात कुटुंबासह दोन ते अडीच महिने ऊस तोडीचे काम केले त्यानंतर चिंचणी वांगी येथीलसानप यांच्याकडील मजूर पळून गेले. त्यांचा शाेध घेऊनही ते न मिळाल्याने त्याने साेनवणे यांचे हात पाय बांधून त्यांना दररोज मारहाण करीत होता तसेच तुला मी जीवे ठार मारेल अशी धमकी देत होता.

दरम्यान साेनवणे यांनी तेथून सुटका करून बाेदवड गाठले. येथे त्यांनी मंगळवारी सानप याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शून्य क्रमांकाने चिंचणी वांगी पाेलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -