‘या’ घटनेमुळे सुरु झाला ‘जागतिक महिला अत्याचार विरोधी दिन’

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । नारीशक्तीत खूप ताकद असते फक्त नारीनेच स्वतःला ओळखायला पाहिजे. आजपर्यंत आपण महिला अत्याचारविषयी सोशल मीडिया किंवा प्रसार माध्यमातून अनेक बातम्या ऐकल्या व पहिल्या असतील. सोबतच दि.८ मार्च रोजी सर्वत्र महिला दिवस साजरा केला जातो हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु महिला अत्याचार विरोध दिनाबद्दल आपल्याला नक्कीच पूर्ण माहिती नसेल. बर हे आज आपण का बोलतोय हा प्रश्न नक्की तुम्हाला पडला असेल तर आज आहे २५ नोव्हेंबर ‘जागतिक महिला अत्याचार विरोधी दिन’.

संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिन महिला अत्याचार विरोधी दिन म्हणून पाळण्याचा ठराव केला. याला कारणही तसेच होते. युरोपमधील मीरा आणि बेल या दोन बहिणींसोबत कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडली होती. पुढे मिडीयाने या घटनेला वाचा फोडली आणि त्यानंतर संपूर्ण युरोपात याचे पडसाद उमटले. महिला संघटना रस्त्यावर उतरल्या आणि युरोपभर महिला शक्तीचे वादळ उठले. घटने लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिन “जागतिक महिला अत्याचार विरोधी दिन” म्हणून पाळण्याचा ठराव संमत केला.

आज आपण सर्वजण अभिमानाने सांगतो की, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. विविध क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व दिसून येत आहे. परंतु आजही समाजात या स्त्रिया हिंसाचाराला बळी पडतात ही मोठी शोकांतिका आहे. एकीकडे महिला सबलीकरणाच्या गोष्टी केल्या जातात तर दुसरीकडे महिला अजूनही शोषणाच्या बळी ठरत आहेत. हुंडाबळी, बलात्कार, विनयभंग, मानसिक छळ आणि अन्याय हे रोजच्या वर्तमानपत्राचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. परंतु यातूनही अन्यायाला न जुमानता तसेच कोणत्याही दडपणाला बळी न पडता अनेक महिला याविरोधात आवाज उठवीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज