मॉर्निंग वॉकला जाणे पडलं महागात, चार महिलांचे दागिने हिसकावून चोरट्यांचा पोबारा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील चार महिलांना मॉर्निंग वॉकला जाणे चांगलं महागात पडलं आहे, कारण मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार महिलांना विळ्याचा धाक दाखवून त्यांचे मंगळसूत्र व कानातील झुमके असा एकूण ६३ हजार रुपयाचा मुद्देमाल हिसकावून पोबारा केल्याची घटना शनिवारी सकाळी घडलीय. या घटनेने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याबाबत असे की, ऐनपूर येथील महिला संगीता विजय पाटील, कल्पना सुभाष पाटील, अर्चना विनोद पाटील, मीराबाई श्रीराम पाटील या चारही महिला दररोज सकाळी मॉर्निंग वॉक साठी खिर्डी रस्त्याने जातात. शनिवारी आजही सकाळी साडेपाच वाजता खिर्डी रस्त्यावरील कॉलेजच्या पुढे एक किमी अंतरावर या चारही महिला नेहमीप्रमाणे फिरत होत्या. यावेळी शेतातून हातात विळा घेऊन सुमारे तीस वर्षीय तरुण समोर आला. त्याने महिलांना विळ्याचे वार करून ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर त्यांच्याकडील मंगळसूत्र व कानातील झुमके मागितले.

जिवाच्या भीतीमुळे महिलांनी दागिने काढून दिले. त्यांची किमत सुमारे ६३ हजार २०० रुपये आहे. हे दागिने घेऊन भामटा पहाटेच्या अंधूक प्रकाशात पुन्हा केळीच्या शेतातून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे, हवालदार ज्ञानेश्वर चौधरी घटनास्थळी आले. त्यांनी महिलांकडून माहिती घेत अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल केला. तपास हवालदार ज्ञानेश्वर चौधरी व ईश्वर चव्हाण हे करत आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -