ढालसिंगी येथे महिलांनी घेतले ‘मधुमक्षिकापालना’चे धडे

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । भारत सरकारच्या शुक्ष्म मध्यम व लघु मंत्रालयाच्या खादी व ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने आयोजित ‘हनि मिशन योजने’ अंतर्गत जामनेर तालुक्यातील ढालसिंगी येथील झाशीची राणी महिला स्वयंसहायता बचत गटाने ‘मधुमक्षिका पालना’चे प्रशिक्षण घेतले.

शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी मधमाशा पालन व्यवसाय अधिक फायदेशीर ठरत आहेत. मधमाशा पालन व्यवसायात महिलांचा सहभाग वाढविण्याठी खादी व ग्रामोद्योग आयोगाने पुढाकार घेतला आहे. मधमाशा पालनातून मिळणाऱ्या उत्पादनाच्या विक्रीतून महिलांचा आर्थिक विकास होत असल्याने जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ढालसिंगी येथील झाशीची राणी महिला स्वयंसहायता बचत गटाला खादी व ग्रामोद्योग आयोगामार्फत मधुमक्षिकापालन प्रशिक्षण देण्यात आले.

मधमाशांची जाणून घेतली माहिती
पाच दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात महिलांना मधमाशा जातीची ओळख, पाळीव व जंगली मधमाशांचे प्रकार तसेच पाळीव मधमाशांच्या वसाहती हाताळणीचे प्रात्यक्षिक व माहीती देण्यात आली. मधमाशा पालन व्यवसायातून मध, मेण, परागकण, गोंद, मधमाशांचे विष, राँयल जेली उत्पादन करुन लाखो रुपये मिळविता येतात तसेच शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी पाळीव मधमाशांच्या वसाहती भाडेतत्त्वावर देऊनही आर्थिक स्थिरता येऊ शकते, असे केंद्र चालक तथा मधमाशा प्रशिक्षक विद्यानंद अहिरे यांनी प्रशिक्षणादरम्यान सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज