fbpx

पाचोरा तहसील कार्यालयात सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

mi-advt

जळगाव : पाचोरा तालुक्यातील समस्याग्रस्त/पिडीत महिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी  तहसिलदार, पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयात दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी ठिक 11.00 वाजता महिला लोकशाही दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दिनांक 23 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे. त्यानुसार समस्याग्रस्त महिलांनी आपल्या तक्रारी प्रत्यक्ष अथवा ईमेलव्दारे संपुर्ण पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करुन सादर कराव्यात.

महिला लोकशाही दिनात करण्यात येणाऱ्या तक्रारीचे स्वरुप वैयक्तीक स्वरुपाचे असावे. तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, आवश्यक कागदपत्रे न जोडलेल्या तक्रारी, सेवाविषयक बाबी स्वीकारण्यात येणार नाहीत.

महिलांनी आपली तक्रार [email protected], [email protected] या ईमेलवर पाठवावी. असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा बालविकास प्रकल्प अधिकारी, पाचोरा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज