fbpx

विवाहितेला भर रस्त्यावर तरुणांकडून मारहाण, नागरिकांकडून बघ्याची भुमिका

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२१ । शहरातील चौबे शाळा चौकात एका विवाहितेला तरुणांकडून भर रस्त्यावर लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार ९.४५ च्या सुमारास घडला. घटनेनंतर तरुणांनी तिथून पळ काढला असून विवाहिता तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली आहे.

आव्हाणे येथील एक विवाहिता नवीन बस स्थानकावरून रिक्षाने आव्हाणे येथे जाण्यासाठी निघाली होती. रिक्षाने जाताना रिक्षातील गॅस संपल्याने चालक गॅस भरण्यासाठी जैनाबाद परिसराकडे गेला. रिक्षामध्ये गॅस भरल्यानंतर परत येत असताना रिक्षा सुरू होत नसल्याने तरुण रिक्षा ढकलत घेऊन आला. चोबे शाळा चौकात आल्यानंतर रिक्षाचालकाला मदत म्हणून विवाहित रिक्षाला धक्का देण्यासाठी खाली उतरली यावेळी त्याठिकाणी बसलेला दिव्यांग तरुण तिच्याकडे पाहून हसला. तरूणाला जाब विचारण्यासाठी विवाहिता गेली असता त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी त्याठिकाणी असलेल्या एका तरुणाने शिवीगाळ केली. वाद वाढत असताना शनीपेठ पोलीस ठाण्याची गाडी आल्याने सर्व शांत झाले.
रिक्षाचालक आणि विवाहिता पुन्हा पुढे निघाले असता काही तरुणांनी शिवीगाळ केली. स्वतःच्या बचावासाठी तरुणांच्या दिशेने विवाहिता शिवीगाळ करीत असताना दुचाकीवर आलेल्या दोन-तीन तरुणांनी काठ्यांनी त्या विवाहितेला मारहाण केली आणि पळ काढला. विवाहितेच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली असून रक्तस्त्राव होत होता. घटनेनंतर विवाहिता तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt