संतापजनक ! चाकूचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशातच जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने चाकूचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. गणेश भागवत मोहिते असे संशयित आरोपीचे नाव असून याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, गणेश भागवत मोहिते याने ३१ डिसेंबर रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान गावातीलच एका ३५ वर्षीय महिलेच्या घराच्या खिडकीतून आत आला. संशयित आरोपी गणेश मोहितेने महिलेला चाकूचा धाक दाखवून तिला तिच्या घराच्या खिडकीतून बाहेर ओढत नेले. घराच्या बाजूच्या बांधकाम चालू असलेल्या घराच्या रूममध्ये घेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी गणेश भागवत मोहिते (वय-३२) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी भारत काकडे करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -