चाकूच्या धाकाने महिलेवर अत्याचार, एकाला अटक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । वाकोद ( ता.जामनेर ) येथील ३५ वर्षीय महिलेवर चाकूच्या धाकाने अत्याचार झाल्याची घटना ३० रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयिताला पहूर पोलिसांनी अटक केली. गणेश भगवान मोहिते (वय ३२, रा.वाकोद, ता.जामनेर) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, संशयित विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

३० रोजी मध्यरात्री संशयित मोहितेने चाकूचा धाक दाखवत झोपेतून उठवले. तसेच खिडकीतून बाहेर खेचून बाजूलाच बांधकाम सुरू असलेल्या खोलीत नेत मारहाण व अत्याचार केला, अशी माहिती पहूर पोलिसांनी दिली. या प्रकरणी पहूर पोलिस स्टेशनमध्ये संशयिताविरुद्ध कलम ३७६, ३५४, ४५२, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी पाचोऱ्याचे डीवायएसपी भारत काकडे यांनी पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे पुढील तपास करत आहेत. घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -