भरधाव वाहनाच्या धडकेत महिला गंभीर दुखापत; गुन्हा दाखल 

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ ।  म्हसावद येथील महिला पायी जात असतांना भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. अलकाबाई डिगंबर उशीर ( वय-५० ) असे दुखापती महिलेचे नाव असून, याप्रकरणी आलकाबाई उशीर यांच्या जबाबावरून अज्ञात वाहन चालकावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, अलकाबाई डिगंबर उशीर ( वय-५०) रा. बोरणार ता. जि. जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. अलकाबाई उशीर ह्या २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कामाच्या निमित्ताने रस्त्याने गिरणी नदीच्या पुलाजवळ पायी जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारे (.एम.पी ०९ बीडी ६९२७ ) या वाहनाने धडक दिली. या धडकेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी  जळगावात खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.
आलकाबाई उशीर यांच्या जबाबावरून गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील करीत आहे.

.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज