छत कोसळून महिला ठार, वृद्ध पती जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । भडगाव तालुक्यातील गिरड येथे पावसामुळे जीर्ण झालेले घराचे मातीचे छत कोसळून त्याखाली दाबल्याने शोभाबाई वसंत पाटील (६०) या जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. यात महिलेचे पती जखमी झाले आहे.

गिरड येथे वसंत पोपट पाटील (७०) हे पत्नी शोभाबाई यांच्यासह राहतात. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने घराचे मातीचे छत जीर्ण झाले होते. बुधवारी पहाटे पाटील दांपत्य झोपेत असताना त्यांच्या अंगावर छत कोसळले.

मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्याने शोभाबाई या जागीच ठार झाल्या तर पती वसंत पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शोभाबाई यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा तलाठी आर. जी. पवार यांनी पंचनामा केला आहे. वारसांना शासनाच्या वतीने मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -