fbpx

धक्कादायक : दिराने डोक्यात कुऱ्हाड घालून केला वहिनीचा खून

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । जळगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून हत्या केल्याची घटना  शहरातील मयूर कॉलनीत आज शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडलीय. दीर दीपक लोटन सोनार (वय ३८) असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव असून योगिता मुकेश सोनार (वय ३९, रा. मयूर कॉलनी) मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत असे की, योगिता सोनार यांचे पतीचे सहा महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. ते आपल्या आठ वर्षाच्या मुलासह दीर आणि सासूसोबत मयूर कॉलनीत राहतात. दरम्यान, मध्यंतरी घरात नेहमी किरकोळ कारणावरून वाद होत होते.

आज अशाच प्रकारचा वाद योगिता आणि त्यांचा दीर दीपक लोटन सोनार (वय ३८) यांच्यात झाला. यामुळे संतापलेल्या दीपकने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घातले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दीपकला रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहचला असून नागरिकांची गर्दी पांगविण्यात येत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक पोहचले आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज