पिण्याचे पाणी भरताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथे ग्रामपंचायतच्या नळाचे पाणी आल्याने पाणी भरण्याकरता पाण्याची इलेक्ट्रिकल मोटर लावण्यासाठी घराच्या ओट्यावर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये कनेक्शन वायर लावत असताना विद्युत शॉक लागल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

रवंजे बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या रत्‍नाबाई महिपत माळी (वय ४५ वर्ष) शनिवारी ग्रामपंचायतच्या नळाचे पाणी आल्याने पाणी भरण्याकरता इलेक्ट्रिकल मोटर लावण्यासाठी घराच्या ओट्यावर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये कनेक्शन वायर लावत होत्या. अचानक त्यांना शॉक लागल्याने त्या जमिनीवर खाली कोसळल्या. त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

याबाबत भास्कर शांताराम माळी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एरंडोल पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -