अंकल मेरी मम्मी वॅक्सिन ले रही हैं क्या? चिमुकल्याचा सवाल : आईची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । भुसावळ शहरातील तापी नगर भागातील रहिवासी रेखा मनोज कुमार (40) या विवाहितेने त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. भारतीय जीवन विमा अर्थात एलआयसीमध्ये नोकरीस असलेले मनोज कुमार हे तापी नगरातील  एका अपार्टमेंटमध्ये दहा वर्षाची मुलगी, पाच वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह वास्तव्यास होते.  गुरुवारी दुपारी मनोज कुमार यांनी दोन ते तीन कॉल केल्यावर सुद्धा कॉल उचलला न गेल्याने ते घरी आले.

घरी आले त्या वेळी घराचे दरवाजे बंद होते त्यांनी मुलांना आवाज देऊन दरवाजा उघडायला लावला. मम्मी कुठे आहे असे विचारल्यावर मम्मी रूम मध्ये आहे असे मुलांनी सांगितले. त्यांची पत्नी ज्या रूममध्ये होती त्या रूमचा दरवाजा सुद्धा बंद होता. तो त्यांनी कसतरी उघडला आणि आत पाहिले असता त्यांच्या पत्नीने गळफास घेतला होता. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह विच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवण्यात आला, अचानक झालेल्या या प्रकारामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

अंकल मेरी मम्मी वॅक्सिंग ले रही है क्या

घटनास्थळी पाहणी करण्यास पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे गेले असता अवघ्या पाच वर्षाच्या बालकाने त्यांना ’अंकल मेरी मम्मी वेक्सिंन ले रही है क्या’ असा प्रश्न केल्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आले. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -