fbpx

उसनवारीचे पैसे मागितल्याने महिलेने एकाचे डोके फोडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ । लक्ष्मी नगरात राहणाऱ्या एका महिलेला हात उसनवारीने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या कुसुंबा येथील ४८ वर्षीय व्यक्तीवर त्या महिलेने दगडफेक केली. कपाळाला दगड लागल्याने पैसे उसनवार देणाऱ्या व्यक्तीचे डोके फुटले असून त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

कुसुंबा येथील गणपती नगरात राहणाऱ्या शिवाजी निळकंठ सोनार वय-४८ यांनी लक्ष्मी नगरात राहणाऱ्या मनीषा दिनेश जैन यांना दोन वर्षांपूर्वी बहिण लताबाई सोनार व भाची पिंकी सोनार यांच्या मध्यस्थीने दोन लाख रुपये हात उसनवारीने दिले होते. वारंवार पैसे परत मागितल्यानंतर ही त्यांनी पैसे परत दिले नाहीत. शिवाजी सोनार हे रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास बहीण व भाचीसह मनीषा जैन यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले असता त्या महिलेने शिवीगाळ करीत दगडफेक केली.

 डोक्याला दगड लागल्याने शिवाजी हे रक्तबंबाळ झाले. महिलेने जीवे मारण्याची धमकी देखील दिली. शिवाजी सोनार यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज