मोबाईल चोरीप्रकरणी महिला गजाआड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । भुसावळ स्थानकावर २० हजार किमतीचा मोबाईल चोरीप्रकरणी १६ डिसेंबरला रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोपी महिला करन बबली चव्हाणला (रा.मध्यप्रदेश) रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याकडून २० हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला.

नरेंद्र पुसालालजी सेन.(वय ५३) (रा.भदवासिया राजस्थान) हे १६ रोजी गाडी क्रमांक २२७३७ अप बिकानेर एक्सप्रेसमधून प्रवास करता असताना गाडी भुसावळ येथे उभी राहिली असता २५ वर्षाच्या महिलेने बर्थवर ठेवलेला मोबाईल नजर चुकवून चोरून नेला होता. तपास आरपीएफ निरीक्षक राधाकृष्ण मिना भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अजीत तडवी, जगदीश ठाकूर, धनराज लुले, दिवानसिंग राजपूत, गायत्री पोरटे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे स.फौ. प्रेम चौधरी, वसंत महाजन अशांनी अटक केली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -