कुंटनखाना चालवणार्‍या महिलेस भुसावळात अटक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२१ ।  भुसावळ सह जळगाव जिल्ह्यात कुविख्यात असलेल्या वैतागवाडी परिसरात बाजारपेठ पोलिसांनी काल रात्री उशीरा टाकलेल्या धाडीत कुंटनखाना चालवणार्‍या एका महिलेसह एका ग्राहकाला अटक केली.

 

याबाबत वृत्त असे की, शहरातील नाहाटा कॉलेज चौफुली परिसरात असणार्‍या वैतागवाडी भागात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या एका पथकाने रात्री उशीरा या भागात छापा टाकला. यात एक ग्राहक आढळून आला. संबंधीत कुंटनखाना चालवणारी महिला आणि त्या ग्राहकाला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायात बळजबरीने ढकलण्यात आलेल्या एका महिलेची मुक्तता केली आहे. तिचा जबाब घेण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -