⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | रस्तालुट करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी अवघ्या तासभराच्या आत मुसक्या आवळल्या

रस्तालुट करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी अवघ्या तासभराच्या आत मुसक्या आवळल्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तालुक्यातील प्रस्तावित मुक्ताई-भवानी अभयारण्यतर्गत मुक्ताईनगर-कुऱ्हा/काकोडा रस्त्यावर ऍपेरिक्षा अडवुन लुटमार करणाऱ्या सहा आरोपींना स्विप्ट डिझायर कार व बंदुकसह ताब्यात घेण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. दि. २८ रोजी संद्याकाळी ४:३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंद प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालु होती.

मुक्ताईनगर-कुऱ्हा रस्त्यावरील डोलारखेडा फाटा ते वायला फाटादरम्यान दरम्यान स्विप्ट डिझायर चारचाकी वाहन (क्र. एमएच ०२ बीझेड ७९३८) मध्ये आलेल्या आरोपींनी धाक दाखवत चिंचखेडा बु येथील रिक्षाचालक देविदास रामदास तायडे याला जबरदस्तीने धमकावत त्याजवळील रोख १६०० रुपये व मोबाईल लांबविला व घटनास्थळावरून पोबारा केला. यासंदर्भात काही गावकऱ्यांना हा प्रकार कळल्यानंतर मुक्ताईनगर पोलीसांत खबर कळविण्यात आली. रस्तालुट करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी अवघ्या तासभराच्या आत मुसक्या आवळल्या.

लुटमारीचा प्रकार घडल्यानंतर पळुन जाण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पुरनाड फाट्यावर पोलीसांनी मोठ्या शिताफीने प्रयत्न केले. मुख्य रस्त्यात दोन ट्रक आडवे लावुन आरोपींना वाहनासह पकडण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले.आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली स्विप्ट डिझायर चारचाकी वाहनासह छर्रे बंदुक जप्त केली आहे.

देविदास रामदास तायडे ( वय ४०) रा.चिंचखेडे बु. यांच्या फिर्यादीवरून आरोपी हुसेन गुलाम रसुलशहा (वय २९),शेख समीर शेख शकील (वय २०), फैयाजखान रियाज खान (वय २०), शेख तौसीफ शेख शकील (वय २०), रिजवान शहा रफिकशहा (वय २०), अमीरखान शब्बीरखान (वय २१) सर्व राहणार मालेगाव जि.नाशिक अशा सहा आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास राहुल बोरकर करीत आहे. दरम्यान घटनेची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकिशोर धनके,मुकेश महाजन,धर्मेंद्र ठाकुर,प्रशांत चौधरी, रविंद्र धनगर,विनोद सोनवणे, मुकेश घुगे,नागरे आदींनी नाकाबंदी करीत कार्यवाही केली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह