अधिवेशनात आ.किशोर पाटलांनी केला केळीच्या नुकसान‎ भरपाईचा प्रश्न उपस्थित

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । राज्याच्या हिवाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदार संघाचे‎ आमदार किशोर पाटील यांनी भडगाव तालुक्यात गेल्या फेब्रुवारीत‎ झालेल्या २ हजार ५०० हेक्टर‎ क्षेत्रावरील केळीच्या नुकसान‎ भरपाईचा प्रश्न उपस्थित केला.‎ विमा कंपन्यांनी अद्याप शेतकऱ्यांना‎ भरपाई न दिल्याने रोष व्यक्त करून‎ राज्य शासन त्या शेतकऱ्यांना‎ नुकसान भरपाई देणार का, असा‎ प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्याचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु झाले आहे. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी‎ ‎ हिवाळी अधिवेशनात गेल्या जुलै‎ महिन्यात जिल्ह्यातील चोपडा,‎ यावल येथे जोरदार वादळ व‎ अतिवृष्टीमुळे केळीचे नुकसान‎ झाले, त्या दोन्ही तालुक्यातील‎ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई‎ मिळाली. मात्र त्याच महिन्यात ७‎ रोजी भडगाव तालुक्यात अतिवृष्टी‎ होऊन अडीच हजार हेक्टर‎ क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान‎ झाले.

या बाबत शासनाचे कर्मचारी‎ ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक‎ हे पंचनामे करतात. मात्र विमा‎ कंपनीचे यंत्र हैद्राबादला आहे.‎ वारावादळ, गारपीट झाल्याचा संदेश‎ हा कंपनीकडे जात नाही. त्यांचा‎ शासनाच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास‎ नाही का? अशी विचारणा केली.‎ कृषी मंत्री दादा भुसे यांनीही या‎ भूमिकेवर सहमती दर्शवली.‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -