पती, पत्नी और वो : प्रेमविवाहानंतर थाटला दुसरा संसार, बिंग फुटले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । शहरातील पिंप्राळा भागातील एका तरुणाचा विवाह झालेल्या तरुणीचा अगोदरच प्रेमविवाह झाला असल्याचे फोटो प्रियकराने व्हाट्सअँप केले आणि त्याची झोपच उडाली. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यात पत्नीचे प्रेमप्रकरण उघड झाल्याने पतीने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पिंप्राळा परिसरातील एक तरुण सरकारी नोकरीला आहे. लग्नासाठीच्या व्हाटसॲप गृपवर औरंगाबाद येथील तरुणीचे स्थळ त्याला आले. दोघांच्या संमतीने ३ मे २०२१ रोजी औरंगाबाद शहरात थाटामाटात लग्न झाले. त्यानंतर मुलगी घरी आली असता काही दिवस तिला घरी सोडून तरुण नोकरीच्या ठिकाणी गेला. थोड्या दिवसानंतर पत्नीलाही तेथे घेऊन गेला. तेथे दोघंच वास्तव्याला असताना पत्नीची वागणूक व्यवस्थित नव्हती. घरी काही वाद, किंवा त्रास दिला का याबाबत आई, वडिलांना फोन करुन विचारणा केली असता त्यांनी तसा प्रकार नाही, परंतु ती इथेही व्यवस्थित वागत नव्हती, असे सांगण्यात आले.

प्रियकर पोहचला थेट पतीच्या भेटीला
लग्नानंतर एक दिवस अचानक पतीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरुन एक मेसेज आला. त्यात तु ज्या मुलीशी लग्न केले आहे, तिच्याशी माझे प्रेमप्रकरण होते व आमचा प्रेमविवाह झाल्याचे त्याने सांगितले. त्यावर संपर्क केला असता त्याने लग्नाचे फोटो पाठविले. त्यानंतर हा प्रियकर या तरुणाला पुण्यात येऊन भेटला व दोघांचे फोटो दाखविले आणि सर्वच उलगडा झाला.

मुलीला मारहाण, पोलिसात फसवणुकीचा गुन्हा
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने पतीने थेट जळगाव गाठून पत्नीच्या आई, वडिलांना बोलावून घेतले. त्यांना प्रेमविवाह तसेच दोघांचे इतर फोटाे दाखविले असता त्यांनी घरातच मुलीला मारहाण करुन जावायाची माफी मागितली व तिला सोबत औरंगाबाद येथे घेऊन गेले. दरम्यान, लग्न झाल्यानंतरही पत्नीने प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचेही उघड झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आई, वडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचे तरुणीने पतीला सांगितले आहे. या प्रकारानंतर तरुणाने रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -