fbpx

कुलरचा शॉक लागून वांजोळ्याच्या विवाहितेचा मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२१ । भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे एका विवाहित महिलेचा घरकाम करताना कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. शारदा वसंत बावस्कर (धनगर) (वय २७) असे या मृत विवाहितेचे नाव आहे. त्यात दीड वर्षाचे बाळ घराबाहेर असल्याने सुर्देवाने बचावले.

शारदा बावस्कर ही महिला सकाळी नेहमीप्रमाणे घरकाम करत होती. तर तिचे पती सकाळीच कामावर गेले होते. दरम्यान, घरातील कुलरचा शॉक लागल्याने शारदा बाजूला फेकली गेली. मात्र, त्यानंतरही तिचा पाय कुलरच्या टपाला लागूनच असल्याने शॉक लागून ती अत्यवस्थ झाल्या. 

हा प्रकार लक्षात येताच रिक्षात टाकून तिला भुसावळात दवाखान्यात नेण्यास निघाले. मात्र, वाटेत भुसावळ रोडवरील सत्संग भवनाजवळ ही रिक्षा अचानक बंद पडली. ती सुरू होण्यास विलंब होत असताना शारदा बाविस्कर यांचा रिक्षातच मृत्यू झाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज