fbpx

सावदा येथे जेवण पार्सलच्या नावाखाली एका हॉटेलवर सर्रास मद्य विक्रीसुरू, प्रसासनाचे दुर्लक्ष

mi-advt

 जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । सावदा येथे कोरोना पार्श्वभूमीवर कडक निर्बंध सुरू असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत, हॉटेल व्यवसायिकांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत फक्त जेवण पार्सल सुविधाच सुरू ठेवण्याचे आदेश आहेतअसें असताना हॉटेलवर पार्सल सुविधांच्या नवा खाली मद्यविक्री सुरू असल्याचे नागरिकांमध्ये आच्चर्य व्यक्त केले जात आहे.

तथापी ब-हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावरील एका हॉटेल मध्ये मात्र सर्रास पार्सल चे नावा खाली अवैधरीत्या मद्य विक्री सुरू आहे, येथे रात्री  उशीरा पर्यंत धडाक्याने ही विक्री सुरू असते दारू मिळत नसल्याचा फायदा घेत सदर ठिकाणी देशी व विदेशी दोन्ही प्रकारचे मद्य चढ्या भावाने विक्री होत आहे

विशेष म्हणजे सदर हॉटेल मुख्य रस्त्यावर व बस स्टॅन्ड पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर असून देखील सर्वाने समोर हा प्रकार येथे सुरू असूनही या बाबत पोलीस व दारुबंदी खाते यांचे याकडे लक्ष जात नाही का? अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे का ? असा प्रश्न नागरिकांचे मनात निर्माण होत आहे, एकीकडे कोरोनाचे नावाखाली सर्वसाधारण व्यापारी आपली दुकाने दिवसभर बंद ठेऊन आपले नुकसान होत असताना देखील प्रशासनास सहकार्य करीत आहेत असे असताना दुसरीकडे मात्र असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य जनतेचा  प्रशासना वरील विश्वास नक्कीच कमी होईल.

या पुर्वी मार्च च्या शेवटल्या हप्त्यात ३ दिवस संपूर्ण जळगांव जिल्ह्यात लॉकडाउन सुरु असतांना सावदा पोलीसांचा रुटमार्चचा सुध्दा सदर हॉटेल मालकवर परिणाम झाला न होता शासन कडून बंदी असो की नसो ३६५ दिवस विनापरवानगी कायद्या चा धाक न ठेवता येथे दारु विक्री सुरू असते इतक्या मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा या हॉटेल मालक मिळवतो कुठून पालीस यंत्रणा अन्न व औषध प्रशासन विभाग अबकारी विभाग यांचे या प्रकाराकडे कानाडोळा तर नाही ना ? असा प्रश्न पडलेला आहे

सदर प्रकारा बाबत बातमी प्रसिद्ध झाली असता थातूर-मातूर कारवाई करून संबंधितांवर केस दाखल न करता दुसरा व्यक्ती देऊन त्याचेवर केस करण्यात येते त्या नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे.. ज्या ज्या वेळी दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश शासनाकडून असते त्या काळात दारू कुठून घेतली अशी विचारणा केल्यास तळीराम उघडपणे  “त्या” हॉटेल चे नाव सांगतात सदरचा अवैधदारू विक्री प्रकार बंद व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज