fbpx

जागतिक पशु दिन का केला जातो साजरा ? जाणून घ्या कुठे झाली सुरुवात

जळगाव लाईव्ह न्युज | गौरी बारी | जागतिक प्राणी कल्याण दिवस म्हणजेच वर्ल्ड ऍनिमल वेल्फेअर डे हा दिवस जगभरामध्ये ४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. प्राण्यांना अनेक ठिकाणी दुय्यम स्थान दिलं जातं व तितक्याच निष्ठुरपणे त्यांच्याशी व्यवहार केला जातो परंतु या दिवशी नष्ट होणाऱ्या विविध प्राण्यांच्या प्रजाती वाचवण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यात येते.

जगात सर्वप्रथम कुठं झाला पशु दिवस साजरा  

जगामध्ये इटलीत सर्वात आधी एनिमल्स वेल्फेअर डे साजरा करण्यात आला आणि या मागचं कारण देखील तितकाच उत्कृष्ट होतं ते म्हणजेच प्राण्यांचे हक्क आणि मानव व प्राण्यांमध्ये संबंध या गोष्टींना मजबूत करण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो व यानंतरच या दिवसाला जगात मान्यता देखील मिळाली आहे. पशु दिन आयसीसीचे सेंट फ्रान्सिस यांच्या जन्मदिवसा निमित्त साजरा करण्यात येतो सेंट फ्रान्सिस हे पशू प्रेमी आणि प्राण्यांसाठी एक सौरक्षका प्रमाणे काम करायचे व याच दिवशी प्राण्यांच्या संबंधित अधिकार व काही मुद्द्यांवर जनजागृती निर्माण करायला सुरवात केली.

1970 ते 2010 मध्ये जवळजवळ 40-50 वर्षात प्राण्यांची स्थिती काळानुसार बदलत गेली आहे. एवढेच नाही तर प्राण्यांच्या संख्येत 50 टक्क्यांपर्यंत पेक्षा जास्त घट झाली आहे. धार्मिक उद्देश किंवा अन्य कारणास्तव जगभरातील जवळजवळ 56 अरब जनावरांची हत्या करण्यात आली होती. हा अहवाल एका सर्वेक्षण रिपोर्ट मध्ये समोर आला. पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे कारण लोकांकडून आपल्या स्वार्थासाठी सातत्याने जनावरांचा बळी दिला जास्त असतो.

 पशु दिवस का साजरा केला जातो ? 

जगातील प्राण्यांच्या प्रजाती कमी होताना दिसत असून त्या वाचवण्यासंबंधित जनजागृती करण्याचा मूळ उद्दिष्ट म्हणून पशु दिवस साजरा केला जातो. महत्वाचं म्हणजे प्राण्यांच्या प्रति आदर आणि प्रेम निर्माण करून तो कायम ठेवण्यासाठीच देखील एक कारण आहे. जागतिक पशू दिनाच्या निमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांच्या माध्यमांतून प्राण्यांच्या बाबत जागृकता अभियानाचे आयोजन करण्यात येते. खरतर जागतिक पशू दिन जगभरातील लोकांना प्राण्यांच्या प्रति प्रेम दर्शवण्यासाठी साजरा केला जातो.

या दिवशी व्यक्तिगत पशू कार्यकर्ता, पशू कल्याण संघटना किंवा पशू प्रेमी यांच्या तर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांच्यादरम्यान मानवी आयुष्य आणि पर्यावरण यांच्यामधील संतुलन कायम कसे राखावे याबाबत अधिक माहिती दिली जाते. म्हणून प्राण्यांना चांगली वागवणूक देऊन पर्यावरणाचा समतोल सांभाळायचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.

पहा विशेष मुलाखत :

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज