जळगाव लाईव्हचे आवाहन : तरुणाईच्या उंबरठ्यावर आजाराने ग्रासले, मदतीसाठी सारे गाव धावले

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील जामनेर पुरा हा एक परिसर.. याच भागातील गौरव खाटीक (वय-१७) लहानचा मोठा झाला.. ऐन तरुणाईच्या उंबरठ्यावर त्याला किडनीच्या आजाराने ग्रासले आणि सर्वत्र अंधार दिसू लागला.. दोन्ही किडनी निकामी झाल्या.. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने किडनी ट्रान्सप्लांटचा मार्ग निघाला.. पोटाच्या गोळ्यासाठी आई किडनी द्यायला तयार झाली पण पैशांची अडचण उभी राहिली… मित्र परिवार, ग्रामस्थ आणि काही दानशूर मदतीसाठी पुढे आले आणि ३ लाखांचा निधी उभारला… गौरवच्या उपचारार्थ आणखी ७ लाखांची आवश्यकता असून आम्ही जळगाव लाईव्हच्या मदतीने देखील आपणास आवाहन करीत आहोत.

जामनेरपुरा येथील रहिवासी तरूण गौरव नंदु खाटीक वय १७ वर्षे याची किडनी निकामी झाली असून तो किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. त्याची घरची परिस्थिती गरीबीची असून तोच कुटुंबाचा आधार आहे. त्याला वाचवण्यासाठी सर्व मित्रपरिवार व रहीवासी प्रयत्न करत आहे.

‘एक हाथ मदतीचा देऊ या’ असं म्हणत गौरवचे मित्रपरिवार व रहिवाशी गौरवला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. गौरवच्या घरचे मोलमजुरी करूण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्याच्या आँपरेशनसाठी लाखो रूपयाचा खर्च असून तो या कुटुंबाला परवडेनासा आहे.

गौरव अनेक दिवसांपासून या आजाराने त्रस्त आहे. गौरव जगण्यासाठी मित्रपरिवार रहीवासी सुद्धा प्रयत्न करत आहे. त्यांच्या हाथाला आपल्या मदतीची गरज आहे. असं म्हणत आपण आपल्या परीने शक्य होईल ती मदत करावी अशी मदतीची हाक गौरवच्या मित्रपरिवाराने नागरिकांना केली आहे.

गौरवच्या मदतीसाठी संपर्क :

गौरवच्या अधिक माहितीसाठी आपण सचिन बोरसे – ८४५९१७५५१९, दिपक राजपूत – ७५०७०७५५५८, अविनाश बोरसे – ८००७६२३८०९ यावर संपर्क साधावा. तसेच आपण PHONE PAY क्रमांक – ९५७९९६२८२७ दिपक धनगर आणि
Bank खाते क्रमांक – 712202010014914 दीपक धनगर Ifsc code UBIN0571229 यावर मदत पाठवू शकतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज