fbpx

काकाचा खून करणारा पुतण्या महिनाभरानंतर एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । शहरातील आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या राजू पंडित सोनवणे यांचा गेल्या महिन्यात डोकं ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने सापळा रचून मयताच्या पुतण्याला अटक केली आहे. सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे असे संशयिताचे नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जुने जळगाव परिसरातील आंबेडकर नगरात राहणाऱ्या राजू पंडित सोनवणे यांचा दि.१२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास डोकं ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार दि.१३ रोजी उघड झाला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडला त्या दिवसापासून त्याचा पुतण्या सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी त्याच्या शोधार्थ पथके रवाना केली होती. पथकाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव याठिकाणी त्याचा शोध घेतला होता.

mi advt

पथकातील कर्मचारी विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील हे त्याच्या मागावर होते. शनिवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास विशाल सोनवणे हा रेल्वे मालधक्का परिसरात आल्याची माहिती निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने शोध घेतला असता भोईटेनगर रस्त्याने पायी फिरत असताना विशाल सोनवणे यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. काका राजू सोनवणे मारहाण करीत असल्याने त्याचा खून केल्याची कबुली विशालने दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज