बकरीसोबत खेळताना बालकाला बसला गळफास, प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । आठ वर्षांचा एका मुलाला खेळत असताना गळफास बसला.काही वेळातच हा प्रकार त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आला.त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.हा प्रकार मुक्ताईनगरातील असून,मोहम्मद शोएब असे मुलाचे नाव आहे.

सविस्तर असे की,मुक्ताईनगर येथील मोहम्मद शोएब (वय ८) हा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घराजवळच खेळत होता. खेळताना अचानक बकरीच्या गळ्यातील दोर त्याच्या गळ्यात फासाप्रमाणे अडकला. हा प्रकार त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याला दोन ते तीन वेळा फिट्सदेखील आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली.त्याच्यावर बालरोग याबाबत मिळालेली माहिती अशी की,विभागात उपचार सुरू आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -