चाळीसगाव येथे बसमध्ये चढतांना अज्ञात चोरट्याने लांबविला मोबाईल

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने महेश्वर सुखदेव घुले (वय-२३) यांच्या खिश्यातून ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल सकाळी ११ वाजेच्या सुमारास लांबविला. याप्रकरणी चाळीसगाव  शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे  की, महेश्वर सुखदेव घुले (वय-२३) रा. वडी रामसगाव ता. घनसांगवी जि.जळगाव हा तरूण कामाच्या निमित्ताने २५ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव शहरात आला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिश्यातील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला. बसमध्ये बसल्यानंतर महेश्वर घुले यांना हा प्रकार लक्षात आला. घुले यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.
बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज