रेल्वे रुळावर फसले मालवाहू वाहन अन् सर्वांचा ठोका चुकला

बातमी शेअर करा

रेल्वे रुळावर फसले मालवाहू वाहन अन् सर्वांचा ठोका चुकला

जळगाव लाईव्ह न्यूज । वसीम खान । शहरातील भोईटे नगर रेल्वे गेट सुपरफास्ट एक्सप्रेस जाण्यासाठी बंद होत असतानाच एक मालवाहू वाहन चालक सिमेंट मिक्सर घेऊन आत शिरला आणि रेल्वे रुळाच्या मधोमध आल्यानंतर वाहन थांबवावे लागले. एक गेट उघडल्यास इतर वाहनचालक आज शिरतील म्हणून गेटमन गेट उघडत नव्हता तर मालवाहू वाहन मागे नेण्याचा पर्यायच नव्हता. वेळीच नागरिकांनी सतर्कता दाखवत सिमेंट काँक्रीट मिक्सर बाजूला कळल्याने अनर्थ कळला आणि रेल्वे मार्गस्थ झाली. रविवारी सायंकाळी ७ वाजता हा प्रकार घडला.

दानापूर एक्सप्रेस जळगावकडून पुणेकडे जाण्यासाठी ७ वाजता निघाली असल्याने भोईटे नगरच्या गेटमनने रेल्वे गेट बंद करण्यास सुरुवात केली. गेट बंद होत असतानाच एक मालवाहतूक वाहन घेऊन चालक आत शिरला. मालवाहूच्या मागे सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन असल्याने कमी तो हळू गतीने रेल्वे रुळावर येताच एक गेट बंद झाले आणि तो अडकून पडला. मालवाहतूक वाहन चालकाने वाहन मागे घेण्याचा प्रयत्न केला परंतु गाडीच्या मागच्या बाजूला सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन बांधलेले असल्यामुळे त्याला वाहन मागे घेता येत नव्हते. इतर वाहन चालक आत शिरतील म्हणून गेटमन गेट उघडायला तयार नव्हता त्यातच रेल्वे येण्याचा वेळ झाला होता. अखेर समोर उभ्या असलेल्या नागरिकांनी समय सुचकता दाखवत गाडी येण्याच्या अगोदरच मालवाहतूक गाडीला बांधलेले काँक्रीट मिक्सर मशीन सोडत एका बाजूला केले व मालवाहतूक गाडीला धक्का देऊन बाहेर काढले. नागरिकांच्या समय सुचकतेमुळे जळगाव शहरात मोठा अपघात टळला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar