fbpx

बोदवड तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा; संभाजी ब्रिगेडची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बोदवड तालुक्यात पेरणीपासूनच पावसाची कमतरता झाल्याने खरीपातील उडीद, मुग, सोयाबीन ही अल्प कालावधीची पिके वाया गेली. काहींनी उपलब्ध सिंचनाद्वारे पिके जगविली मात्र, अशातच, गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीत कापुस, मका, ज्वारी, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापसाची बोन्डे सडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अद्यापही शेतकऱ्याच्या शेतमालाचे पंचनामे झालेले नाही, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकरी बांधवांना सरसकट भरपाई मिळावी व ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज