जळगावकरांनो सावधान ! जिल्ह्याला IMD कडून अलर्ट जारी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२१ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, आज राज्यभरात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात एकट्या पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस झालेला आहे. पावसाचे तीन महिने उलटून गेले असता तरी देखील जिल्ह्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याचे संकट ओढवले गेले होते. परंतु गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाण्यात पातळीत मोठी वाढ झाली आहे. आज हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

दरम्यान, आज पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर  कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यातल्या जवळपास 18 जिल्ह्यांत पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

पालघरला रेड अलर्ट, औरंगाबाद, जळगावला यलो अलर्ट
विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्याला पावसाचा आज कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. केवळ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जळगाव, औरंगाबाद, जालन्याला देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

बाप्पाचं आगमन कोणत्याही विघ्नाशिवाय
राज्यात सध्या असलेला जोरदार पावसाची तीव्रता, 9 सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना कोणतीही अडचण नसेल. यंदाचं बाप्पाचं आगमन पावसाच्या विघ्नाशिवाय होईल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -