आम्हाला पगारवाढ नको; राज्य शासनात विलीनीकरण हाच अंतिम पर्याय

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । आम्हाला पगारवाढ नको आहे, केवळ राज्य शासनात विलीनीकरण हवे आहे, शासनात विलीनीकरण करून १५ हजार मिळाले तरी गोड मानू. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण हाच अंतिम पर्याय असून, जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचे येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतनात अडीच ते पाच हजार रुपयांच्या पगारवाढीवर मत व्यक्त केले.

सविस्तर असे की, जळगाव आगारात बुधवारी सायंकाळी ७ वाजेला अनेक आंदोलक परत येत त्यांनी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ नाकारत शासनात विलीनीकरण या एकाच मागणीवर ठाम राहात घोषणाबाजी केली.दरम्यान, शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात अडीच ते पाच हजारांची पगारवाढ दिली. मात्र, जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. एसटी कर्मचारी केवळ विलीनीकरण या एकाच मुद्यावर ठाम आहे. आम्हाला पगारवाढ नको आहे, केवळ राज्य शासनात विलीनीकरण हवे आहे, असे मत यशोदा पांढरे यांनी व्यक्त केले.

आगार प्रमुखांशी औपचारिक गप्पा

राज्य शासनाचा आंदोलकांना पगारवाढीचा निर्णय आल्यानंतर आंदोलकांशी आगारप्रमुख नीलेश पाटील यांनी औपचारिक गप्पा मारल्या. गेल्या १८ दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यावरही या आंदोलक कर्मचाऱ्यांनी हास्यविनोद करत वातावरणात गंभीरता न येऊ देता जुन्या आठवणी जाग्या केल्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज