fbpx

जळगाव शहराचा पाणीपुरवठा ‘इतके’ दिवस ढकलला पुढे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ जुलै आणि १ ऑगस्ट ला होणारा पाणी पुरवठा १ ऑगस्ट आणि २ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेला प्रशासनाने दिली आहे.  

शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या वाघूर केंद्रावरील ३३ के व्ही उच्चदाब वाहिनीच्या केबलमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाघूर पंपींग स्टेशनला होणारा वीज पुरवठा ३० जुलै सकाळी २ वाजेपासून खंडित झाला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी १ दिवस लागणार आहे. पर्यायी ३१ जुलै आणि १ ऑगस्टला होणारा पाणी पुरवठा १ ऑगस्ट आणि २ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेला प्रशासनाने दिली आहे.  

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt