fbpx

वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज (मंगळवार) संध्याकाळी ५.३० वाजेपासून वाघूर धरणातून पुर्वीचा ३४० क्युसेक व वाढीव ३४० क्युसेक्स असा एकुण ६८० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.

नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

दरम्यान, आज जळगाव शहरासह परिसर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. पश्चिम बंगाल परिसरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या ४८ तासात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २१ ते २३ सप्टेंबर या दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आज जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

परतीचा पाऊस लांबणीवर…

यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना खरिपातील पीक काढण्यासाठी पुरसा वेळ मिळणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. परतीचा पाऊस ऐनवेळी दगा देत असल्याने दरवर्षी पीक पाण्यात वाहून जातात. पण यंदा लांबणीवर असलेल्या पावसामुळे पिकांची काढणी ही वेळेत करण्यात येणार आहे. खरंतर, यंदा राज्यात परतीच्या पावसाला उशिरा सुरुवात होणार असून महाराष्ट्रातही हा पाऊस उशिरा दाखल होण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज