यावल तालुक्यातील मुदत संपणाऱ्या १० ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग रचना सुरू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । यावल तालुक्यात कोरोना महामारीमुळे थांबलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. तालुक्यातील मुदत संपणाऱ्या १० ग्रामपंचायतींमध्ये जानेवारी २१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान या कालावधीत प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने त्या-त्या गावात नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.

राज्यात मार्च महिन्यापासून करोनाचे संकट आले होते. लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रम बंद करण्यात आले होते. मुदत संपली तरी करोनाच्या संकटामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने तहकूब होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेतल्या जात आहे.

तालुक्यातील मुदत संपणाऱ्या १० ग्रामपंचायतींमध्ये जानेवारी २१ ते डिसेंबर २०२२ दरम्यान या कालावधीत प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या क्षेत्रात प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. प्रभाग रचनेनंतर आरक्षण निश्चिती केली जाईल.

या ग्रामपंचायतींचा समावेश

मुदत संपणाऱ्या ग्रा.पं.मध्ये चितोडा, परसाडे बुद्रुक, मालोद, चिखली बुद्रुक, कासारखेडा, कोळन्हावी, चुंचाळे, पिळोदे बुद्रुक, पाडळसे, चिखली खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -