सावदा येथील वानखेडे कुटुंबीय बचावले, रस्तालूट प्रकरणात चौघांना अटक‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । अज्ञात चोरट्यांनी ‎लुटीच्या उद्देशाने चार ते पाच‎ वाहनांवर दगडफेक केल्याची घटना‎ मध्य प्रदेशातील शेरीनाका सीमेच्या‎ पुढे गाडग्याआम ते शिव गुफा ‎फाट्यादरम्यान २ रोजी रात्री १०.४५‎ वाजेच्या सुमारास घडली. त्यात‎ सावदाच्या एक ‎कुटूंब प्रसंगावधान राखून बचावले. ‎या प्रकरणी पोलिसांत माहिती दिली. त्यांच्या गस्ती वरील पथकाने चार ‎संशयितांना रात्रीच ताब्यात घेतले.‎

सावदा येथील माजी नगराध्यक्ष‎ राजेश वानखेडे यांचे बंधू शेखर‎ वानखेडे हे पत्नी, मुलगा व पुतण्या‎ सोबत खासगी वाहनाने‎ (एमएच.१९-सीव्ही. १५४१) रात्री‎ महेश्वर व ओंकारेश्वर येथून‎ खरगोन-पिंपरूड महामार्गाने‎ पालकडे येत होते. मध्य प्रदेशातील‎ शेरी नाका सीमेपलीकडे तीन‎ दुचाकींवर फिरणाऱ्या सहा ते सात‎ भामट्यांनी गोफणीने त्यांच्या‎ कारवर चालकाकडील बाजूने‎ दगडाचा मारा केला. त्यात‎ चालकासमोरील काच व‎ स्पीडोमीटरचे डेस्क फुटले. त्यांच्या‎ पत्नीच्या खांद्यावर दगड आदळून‎ मुका मार लागला. मात्र,‎ प्रसंगावधान राखून त्यांनी वाहन न‎ थांबवता घटनास्थळावरून भरधाव‎ वेगाने पाल-शेरीनाका तपासणी‎ नाका गाठला. तेथे रावेर पोलिसांना‎ माहिती दिली. मात्र, रावेर‎ पोलिसांंकडे पाल औटपोस्टसाठी‎ गस्ती वरील वाहन नाही. तथापि‎ हेलापाडाव (मध्य प्रदेश) पोलिस‎ दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार रमेश‎ पवार यांना रावेर पोलिस स्टेशनचे‎ फौजदार विशाल सोनवणे यांनी‎ घटनेची माहिती दिली.

यानंतर‎ भगवान पुरा पोलिस ठाण्याच्या गस्ती‎ पथकाने घटनास्थळावरून चार‎ संशयितांना एका दुचाकीसह‎ ताब्यात घेतले आहे. हे संशयित‎ उतांबडी (ता.बऱ्हाणपूर) येथील‎ आहे.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -