fbpx

हॉटेलमध्येच गळफास घेत वेटरने संपविले जीवन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीनजीक असलेल्या हॉटेल महाराजा येथील वेटरने गळफास घेत आत्म्हत्या केली आहे. हॉटेलमधेच फाशी घेत आपली जिवनयात्रा संपवणा-या वेटरचे नाव जितू असे सांगितले जात आहे. त्याचे पुर्ण नाव समजू शकले नाही.

गळफास घेणारा जितू हा चाळीसगाव येथील रहिवासी असून त्याचा मृतदेह जळगाव सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनकामी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने खळबळ माजली आहे. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे कामकाज सुरु होते. जितू नाव असलेल्या वेटरने आत्महत्या का केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज