जिल्ह्यात पुन्हा कोसळधार ! वाघुर धरणाचे ८ दरवाजे उघडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होत आहे. धरण पूर्ण भरल्याने आज रविवारी सकाळी धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले.

आज सकाळी आधी वाघूर धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणातील पाण्याची पातळी अधिक वाढली. त्यामुळे सकाळी पुन्हा धरणाचे ८ दरवाजे उघण्यात आले. सध्या धरणातून १३ हजार ३७७ इतक्या क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांनी कळविले आहे. दरम्यान, वाघूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने शहरासह तालुका परिसरातील रब्बी पिकासाठी पाण्याची सोय उपलब्ध झाली असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सुरुवातीला मान्सूनने दीड ते दोन महिने जिल्ह्याकडे पाठ फिरविली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत सापडला होता. जुलैमध्ये काही थोडाफार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु त्यानंतर पावसाने ओढ दिली होती. ऑगस्टच्या मध्यंतरी अधूनमधून पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले होते. सप्टेंबरच्या सुरुतीपासून जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरण १००% टक्के भरली गेलीय.

सध्या जिल्ह्याला आज आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पहाटपासून जिल्ह्यात पावसाची सततधार सुरु आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज