‘वेड लागले’ साँग झाले रिलीज

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ सप्टेंबर २०२१।  अरविंद एंटरटेनमेंट प्रेझेंट ‘वेड लागले’ हे मराठी ऑफिशियल अल्बम सॉंग गेल्या महिन्यात शूट झाले आहे. याचे दिग्दर्शन प्रदिप भोई यांनी केले आहे. चित्रीकरण पाल व मध्य प्रदेशमध्ये करण्यात आले आहे.

‘तुझे पैंजण’ या मराठी रोमॅंटिक सॉंग नंतर अरविंद इंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा एक धडाकेबाज रोमँटिक सोंग घेऊन आले आहे. नुकतेच इंटरटेनमेंटच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला ‘वेड लागले’ हे फुल साँग रिलीज झाल.

बंधन प्रोडक्शन आणि भाग्यदीप म्युझिक हे या गीतामध्ये असोसिएट पाहणार असून प्रवीण लाड , पायल राऊत आणि शुभम चिंचोले यांनी गाण्यामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे सोबतच नेहा वंदना सुनील, खुशबू शिंदे, ऋतिका पाटील, रितेश इंगळे आणि अजय सोनवणे यांनी सह कलाकाराची भूमिका निभावली आहे. गाण्याचे बोल हे प्रवीण लाड यांचे असून, कम्पोसिंग मध्ये प्रवीण लाड आणि कुणाल पवार यांनी काम केलं आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -