जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानास प्रारंभ

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा बँक संचालक पदाच्या १० जागांसाठी जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रांवर आज रविवारी सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून उद्या साेमवारी सकाळी ८ वाजेपासून मतमाेजणी हाेणार आहे. राजकीय नेतृत्वाच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे पारडे जड असले तरी मतदारांचा काैल काेणाच्या दिशेने याबाबत राजकीय धास्ती कायम आहे.

बँकेच्या २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित दहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे.  रावेर, यावल, चोपडा, भुसावळ अशा चार विविध कार्यकारी सोसायटी व इतर संस्था व व्यक्ती, इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती जमाती, वि.जा.भ.ज., यासाठी प्रत्येकी एक, तर महिला राखीव गटात दोन जागा, अशा सहा जागांसाठी मतदान होत आहे. जिल्हा बँकेच्या चार विविध कार्यकारी सोसायटी आणि पाच राखीव जागांसाठी रविवारी (ता. २१) मतदान होत आहे. यात ४२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पंधरा तालुक्यांत मतदान केंद्र आहे. सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदानाची वेळ आहे. एकूण दोन हजार ८५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दोन हजार ८५३ मतदार बजावणार हक्क

निवडणुकीसाठी एकूण दोन हजार ८५३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. विविध कार्यकारी सोसायटीचे ८५३, इतर संस्था व व्यक्तिगत सभासद दोन हजार मतदार आहेत. तालुकानिहाय स्थिती अशी जळगाव : वि. का.- ६२, इतर संस्था- ३३८ , भुसावळ- वि. का.- २६, इतर संस्था ११३, यावल-वि. का. ४८, इतर संस्था, २८५, रावेर- वि. का.- ५४, इतर संस्था- २४६, मुक्ताईनगर- वि. का.- २७, इतर संस्था- ४९, बोदवड- वि. का. ३८, संस्था- २२, जामनेर- वि. का. ९४, इतर संस्था- ११३, पाचोरा- वि. का. ७६, इतर संस्था- १०७, भडगाव- वि. का. ३९, इतर संस्था- ८९, चाळीसगाव- वि. का.- ७८, इतर संस्था- १०५, पारोळा- वि. का.- ६५, इतर संस्था- १२९, अमळनेर- वि. का.- ९२, इतर संस्था- ९४, चोपडा- वि. का.- ६४, इतर संस्था- १५२, धरणगाव- वि. का.- ५७, इतर संस्था- ८१, एरंडोल-वि. का.- ३३, इतर संस्था- ७७.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज