fbpx

विवरे बु उपसरपंच भाग्यश्री पाटलांनी दबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जून २०२१ । रावेर तालुक्या च्या राजकारणात महत्वाच्या ठरणाऱ्या विवरे बु॥ ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक सत्ताधारी गट प्रमुख वासुदेव नरवाडे व विरोधी गट प्रमुख विपीन राणे, शिवाजी पाटिल यांच्यात वर्चस्वा साठी जिकरीची ठरली. यात वासुदेव नरवाडे गटाने बाजी मारत वर्चस्व सिद्ध केले. तर विरोधी गट प्रमुख विपीन राणे, शिवाजी पाटिल यांच्या गटाला सुरूंग लावल्याने भाग्यश्री पाटिल व विनोद मोरे हे दोन सदस्यांनी गटप्रमुखांच्या निष्क्रीयतेला रामराम ठोकल्याने पानिपत झाले. वासुदेव नरवाडे गटात १५ पैकी ९ सदस्य आल्याने वर्चस्व कायम राहिले. तर विरोधी गटाला खिंडार पाडून रामराम ठोकत विनोद मोरे हे वासुदेव नरवाडे गटात सामील झाले.

१२ फेबुवारी रोजी उपसरपंच निलीमा सणंसे यांची निवड होवून २३ एप्रील रोजी राजीनामा दिल्याने मंजूर करण्यात आला होता. या रिक्त उपसरपंच पदासाठी ६ मे रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत सत्ताधारी पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांनी विरोधी गटाला सुरूंग लावल्याने सौ भाग्यश्री विकास पाटिल उपसरपंच झाल्या.

परंतु विरोधकांनी गोंधळ घालून व दबाव टाकून लगेच दोन दिवसात ८ मे रोजी राजीनामा सरपंचां समोर ठेवला. त्या राजीनाम्याच्या पडताळणी साठी ३१ मे रोजी मासिक सभा घेण्यात आली. हि मासिक बैठक कोरम अभावी तहकुब करण्यात आल्याने २ जुन रोजी विशेष बैठक सरपंच युनुस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत ८ मे रोजी दिलेला राजीनामा मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने दबावापोटी भितीने दिला असल्याने मंजूर करण्यात येवू नये. असे उपसरपंच सौ भाग्यश्री पाटिल यांनी लेखी पत्राद्वारे सांगितल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt